Ad will apear here
Next
अटल महापणन विकास अभियान यशोगाथेचे प्रकाशन


मुंबई : सहकार व पणन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या अटल महापणन विकास अभियान यशोगाथेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १२ फेब्रुवारी २०१९ रोजी मंत्रालयात प्रकाशन करण्यात आले.

या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आरोग्य व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पदुम मंत्री महादेव जानकर, पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि मुख्य सचिव दिनेश कुमार जैन उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सहकारी संस्थांनी सुरू केलेल्या व्यवसायांची व बजावलेल्या कामगिरीच्या यशोगाथा या पुस्तिकेतून मांडण्यात आल्या आहेत.

या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था, खरेदी विक्री संघ आदी पाच हजार सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. कृषी क्षेत्राच्या विकासासोबत सहकारी संस्था, पणन व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न होत आहेत. ‘मेक इन इंडिया’ व ‘मेक इन महाराष्ट्र’च्या धर्तीवर गाव पातळीवर सहकार व पणन क्षेत्रात ‘मेक इन व्हिलेज’ राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात सहकार क्षेत्रात रोजगार निर्मिती वाढणार आहे.

या अभियानाच्या अंतर्गत सुमारे दोन हजार विविध सहकारी संस्थांनी व्यवसाय सुरू केले आहेत. योगदानातून घडलेल्या यशोगाथांची माहिती नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. नाविन्यपूर्ण व्यवसाय व उपक्रमाची माहिती या पुस्तिकेतून देण्यात आली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZSIBX
Similar Posts
‘कमी पाऊस होऊनही शेतीतील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढली’ मुंबई : राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी होऊनही उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टन झाली. शेतीतील गेल्या साडेचार वर्षांतील गुंतवणूक आणि जलसंधारणाच्या कामांचे हे यश आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बि-बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना बँकांना केल्या आहेत
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी मुंबई : मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील पाच हेक्टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळून शहरातील वाहतूकीची समस्या दूर होणार आहे. यासाठी पुणे शहरातील
‘चंद्रकांत पाटील यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजप अधिक मजबूत बनेल’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, त्यांच्या संघटन कौशल्यामुळे सरकार व जनतेमधील संघटनेचा सेतू अधिक मजबूत बनेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
‘भाजपचे डावखरे विजयी होतील’ मुंबई : ‘विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारीसाठी निरंजन डावखरे यांची केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली असून, ते निवडणुकीत निश्चित विजयी होतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २४) व्यक्त केला, तर ‘निरंजन डावखरे यांच्या विजयामुळे कोकणात भाजपला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language